माझा प्रताप
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आमच्या लग्नाला नुकतेच दहा दिवस झाले होते.माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी आम्ही गाडी पकडायला तालुक्याची ठिकाणी आलो होतो.गावी एक बस चुकली की दुसऱ्या बस साठी जवळ जवळ दोन तास थांबावे लागायचे.आमची ही बस चुकली होती आता थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. एका झाडाखाली सावलीला मी आणि माझी बायको बोलत उभा राहिलो होतो. मुंबईत एवढा वेळ थांबायची सवय नव्हती पण इथे काही पर्याय नव्हता .इतक्यात एक आजी समोर आली.ती तिच्याकडे असलेले पैसे सारखी सारखी मोजत होती. कपडे तसे जुनेच चेहरीवरती सुरकुत्या पडलेल्या पायात तुटलेली चप्पल.दुपारची वेळ झाली होती. चेहरा गंभीर .कदाचित पैसे कमी असतील किंवा गावी जायला गाडीचे पैसे कमी असतील म्हणून मीच विचारले काय झालं आजी काही मदत करू का. तीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली काय करशील बाबा पैसे पाहिजेत डॉक्टरला द्यायला. काय झालं ....मी म्हणालो. ती माझ्याकडे बघू लागली .एकतर कधी बस नि जाता येता अर्धे तिकीटा चे पैसे वाचवण्यासाठी वयोवृद्धाचा पास काढायला आलो होतो.पण त्यो डॉक्टर पैसे मागालाय .म्हणतोय तुमचा बी फ...