माझा प्रताप

           दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आमच्या लग्नाला नुकतेच दहा  दिवस झाले होते.माझ्या मावस बहिणीच्या लग्नासाठी आम्ही गाडी पकडायला तालुक्याची ठिकाणी आलो होतो.गावी एक बस चुकली की दुसऱ्या बस साठी जवळ जवळ दोन तास थांबावे लागायचे.आमची ही बस चुकली होती आता थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. एका झाडाखाली सावलीला मी आणि माझी बायको बोलत उभा राहिलो होतो. मुंबईत एवढा वेळ थांबायची सवय नव्हती पण इथे काही पर्याय नव्हता .इतक्यात एक  आजी समोर आली.ती तिच्याकडे असलेले पैसे सारखी सारखी मोजत होती. कपडे तसे जुनेच चेहरीवरती सुरकुत्या पडलेल्या पायात तुटलेली चप्पल.दुपारची वेळ झाली होती. चेहरा गंभीर .कदाचित पैसे कमी असतील किंवा गावी जायला गाडीचे पैसे कमी असतील म्हणून मीच विचारले काय झालं आजी काही मदत करू का. तीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली काय करशील बाबा पैसे पाहिजेत डॉक्टरला द्यायला. काय झालं ....मी म्हणालो. ती माझ्याकडे बघू लागली .एकतर कधी बस नि जाता येता अर्धे तिकीटा चे पैसे वाचवण्यासाठी  वयोवृद्धाचा पास काढायला आलो होतो.पण त्यो डॉक्टर पैसे मागालाय .म्हणतोय तुमचा बी फायदा हाय तर आम्हालाबी मिळुदे जरा. फायदा हाय पण पैसे नको का तेवढे त्याला द्यायला.  त्यांची ते बोलणं आणि राहणीमान बघून काहीतरी कारावस वाटत होतं. जास्त विचार न करता चला म्हणलं, बाबा कुठे आहेत आणि चला डॉक्टर कडे जाऊया.

      दवाखान्यात जाई पर्यंत नाना परीचे विचार डोक्यात येत होते . मी दिसायला वयाने लहान दिसत असल्याने डॉक्टर माझे ऐकतील का ? ते कसे ऐकतील? असे बरेच प्रश्न डोक्यात येरझाऱ्या घालत होते.जसजस दवाखान्या जवळ पोहोचत होतो तसे विचार ही गरागरा फिरायला लागले शेवटी एका ब्राह्मण व्यक्तीची रूपरेषा डोक्यात आली .नाटकात एक  भूमिका साकारण्यासाठी मी ठाण्यात कचराळी तलावाच्या भोवती फिरणाऱ्या माणसाच्या बोलीभाषेवर जरा ऑब्जेर्वेशन ठेवले होते त्यात एका माणसाची पध्दत मला लय आवडलेली तीच पद्धत आता माझ्या अंगात घुसली होती आणि मी दवखान्या समोर उभा होतो. शिपायाला हाक मारत डॉक्टरला  ऐकायला जाईल आशा आवाजात बोललो की मला डॉक्टराना भेटायचे आहे पेशंट नसतील तेव्हा पाठवा.एव्हाना माझी बोलण्याची पध्दतीत कमालीची बदल झालं होतं एक साधारण दिसणारा पण सरकारी  असल्या सारखा वावरू लागलो होतो.शिपायांनी विचारलं काय काम आहे . माझ्यासोबत आजी होत्याच मी म्हंटल यांचं दाखला द्यायचे काम तुमच्याकडेच आहे ना त्या संदर्भात.शिपाई आत गेला डॉक्टर खिडकीतून सगळं ऐकत होता त्याने काही सांगितले आणि शिपाई बाहेर आला आणि म्हणाला आत्ता डॉक्टरांकडे वेळ नाही तुम्ही नंतर या.    नसेल भेटायचं तर राहूदे नंतर बोलू नका, पहिलं बोलायचं ना लगेच वर कशाला मॅटर नेला म्हणून... ठीक आहे मी उत्तरलो.मी मोबाइल काढला आणि फोन लावला हॅलो सर मी मोरे बोलतोय कोल्हापूर वरून . शिपाई माझ्यावर चोरून लक्ष ठेवत होता. मी ही त्याच गोष्टीची वाट बघत होतो.माझा आवाज त्याला ऐकायला जाइल अश्यापद्धतीने पण दबक्या आवाजात ठेवून चालू ठेवले " सर आपले नियम इकडे लागू होतात का ...मग काय प्रोसेस करावी लागेल .....ओके ओके.....असे बोलून मी बाहेर आलो फोन वर असलेला बबन बराच गोंधळला  होता तो वारंवार सांगत होता अरे मी बबन बोलतोय ,त्याला  काय माहित मी इथे काय करतोय ते . त्याला सांगितलं की मला यायला उशीर होईल आमची गाडी चुकली .तोपर्यंत शिपायाने आपले काम चोख केले मी बोललेली सगळी माहिती त्याने डॉक्टरकडे पोहोचवली.त्याने आवाज दिला डॉक्टरांनी बोलावलंय मी फोन कट केला आणि निघालो आता मात्र समोरासमोर बोलणं होत मन थोडं घाबरला होत पण कॅरॅक्टर मधून बाहेर नाही पडलो.मुद्दाम एंट्री करताना दरवाजा वाजवला येऊ का विचारला .त्याने मानेनी बसण्यासाठी  इशारा केला आणि बोलला "बोला.. काय काम आहे" . मी ही त्याच पद्धतीने बोललो "हे पेशंट तपासून झाले की बोलू उगाच गावभर बोंबटा कशाला" आत मध्ये जो पेशंट होता त्याची तपासणी झाल्यावर ते म्हणाले काय काम होत . मी म्हणालो त्या ज्या बाहेर आजी उभ्या आहेत त्यांच्याकडून तुम्ही तीनशे रुपये मागितले, दाखला साठी .हो मग ......मला त्याची पावती हवी आहे .... डॉक्टर उत्तरला त्याची पावती मिळत नाही ,अशी कशी भेटत नाही पैसे घेता मग पावती द्यायला काय झालं. मिळणार नाही.अमच्यावर्ती पण साहेब आहेत त्यांच्यावरती ही आहेत सगळ्यांना द्यावे लागतात.तुम्हाला कुठे तक्रार  करायची असेल तर करा.तसेही  नसेल जमत तर कोल्हापूरला जा तिकडे काढा ...आम्हाला काही प्रॉब्लेम नाही.... मी खुर्ची वरून उठलो आणि म्हणालो बघा तुम्ही ही सरकारी आणि आम्ही ही सरकारी इथे आमची जास्त पावर नाही आहे कारण मी इथे फक्त लग्नाला आलोय बाकीचे इकडे मला राहायचे नाही आणि कारवाई करायचाच म्हंटल तर मला ही तीन चार फेऱ्या मारावे लागतील उगाच..बर असुदे तुमच्यासाठी तेवढं करिन मी...... आत्ता तो पुरता गोंधळाला त्याला काही सुचेना, त्याने माझा हात पकडला आणि खाली बसायला सांगितले .आता माझाही गोंधळ झाला होता मनात धाकधूक जोरात चालू झाली.शिपायाला बोलावून त्याने दोन चहा आणायला सांगितलं तेव्हा जर हायस वाटलं. साहेब तुम्हाला चाय बरोबर काही...नको काही नको बस आपलं मत महत्वाचे मी बोललो .आपण कोण आणि काय काम करता आणि इकडे कसे असे एकदम शांत पने विचारले .मी ही बोलायला सूरु केले मी ग्राहक समितीचा सदस्य आहे . तुम्ही पैसे घ्या काही वाद नाही पण पावती तेवढी द्या . तो हसला काय साहेब चेष्टा करता काय तुम्हालाही माहीत आहे या पैस्याची पावती बनत नाही.आणि वरपर्यंत पैसे पोहचावावे लागतात त्यामुळे ते घ्यावेच लागतात .मी ही शांततेत उत्तर दिलं की हे कसं आहे ना साहेब की हे जे शेतकरी गरीब माणसे आपले थोडेफार पैसे वाचतील म्हणून हे कार्ड काढायला येतात आणि तुम्ही त्यांनाच लुटतात किमान त्यांच्या अंगावरचे कापडे बघून तरी अंदाज घ्यायचं की खरच यांच्याकडे पैसे असतील का . मी इथे लग्नासाठी आलोय .यांची परिस्थिती चांगली नाही म्हणून मी इथपर्यंत आलो पण जर अस होत असेल तर काय फायदा शिकण्याचा सर्वच शेतकरी पैसेवाले नसतात परिस्थितीचा विचार करा. मी बाकी काही बोलणार नाही तुम्हाला माझं बोलणं चुकीचे वाटत असेल तर सॉरी मी इथून निघतो पण नंतर मी काही केलं तर बोलू नका .आणि मी जागेवरून उठलो तो परत बसऊ लागला काय करू मी असे तुमचे म्हणणे आहे. मी एक नजर बाहेर मारली बरेच शेतकरी लांबून लांबून आले होते. बघा डॉक्टर साहेब मी एकच सांगेन की मला माहीत आहे की वरखर्च सगळ्यांनाच हवा असतो तुम्हाला घ्यायचा असल्यास तो श्रीमंत व्यक्तीकडून घ्या . शेतकऱ्यां कडून नका घेऊ. कापड्यावरून तरी तुम्हाला त्यांच्या परिस्थितिचा अंदाज येईलच. लगेचच त्याने शिपायला बोलावून बाकीच्यांचे पैसे परत करायला लावले. तो बाकीची काही चौकशी करणार इतक्यात मी आभार मानले आणि निघालो. गाडीची वेळ झाली होतीच.तो ही दरवाजापर्यंत सोडायला आला . आजी ना हाक दिली तोपर्यंत त्यांचं आणि बाबांचं दाखल्याच काम झालं होतं ...माझंच मला आश्चर्य वाटात होत मी असे काही केले आणि एवढं धाडस कस केलं त्यांनी माझी तपासणी केली असती तर ...अश्या बऱ्याच प्रश्नांनी डोक्यात काहूर माजला होता. पण एका गोष्टी ने सुखावलो होतो की माझ्या हातून कोणाचे काही तरी भले झाले.मी बस स्टॉप वर पोहोचलो बाकीचे माझी वाट पाहताच होते लगेच बस ही आली. घाबरलेला मन काही शांत होईना अशी हिम्मत आलीच कुठून हे समजत नव्हतं . गाडीत बसलो आणि केलेला प्रताप बायकोला सांगत होतो.

Comments